Tuesday, January 5, 2021

दोन मैत्रिणी आणि लग्न सोहळा




सोहळा नाही केला
केली एक सही
तिला वाटले लग्न म्हणजे
विशेष नसते काही,

कशाला हवी हळद
मेंदी कशाला हवी
तो आहे मी आहे
इतरान्नी का तसदी घ्यावी,

पार पडले लग्न
पोचली नवीन घरी
अचानक बदलले जीवन
 सुचेनाच काही,

सर्वांचा स्वयंपाक मी का करावा
पाहुणे सणवार ते अगणित
कटकट वाटले सगळे
आधी idea च नव्हती काही,

मैत्रीणीला सहज़ कसे जमले
विचारुन पाहिले तिनी
ती म्हणाली लग्नाची
हळू हळू केली तयारी,

कुळाचाराला आले पाहुणे
केळवण झाले दहा घरी
कसे टिकवले नातेसम्बन्ध
कळली त्याची महती,

हळदीला सर्वांनी धमाल केली
सोन्याहून पिवळी माझी नाती
मी सुद्धा संसार प्रेमानी करीन
मनोमन केली मी माझी तयारी,

मेंदिच्या दिवशी सर्वांनी
हातानी घास भरविले
बहिनींणी रंग चढ़ावा
म्हणून कष्ट सुद्धा घेतले,

विहिणीच्या पंगातिची, रुखवंताची
आई काकुची तयारी
कारल्याची वेल असली तरी
 शुद्ध गोडव्याची ग्वाही,

लक्ष्मी पूजनाने सासरी
मान दिला गृहलक्ष्मीचा
अधिकार आपसूकच आला
प्रेमाचा आणि आपलेपणाचा,

उखाण्यान्नी हसवीले सर्वाना
गाठ सोडताना आली गम्मत
नणंद दीर पाठीशी माझ्या
कुठेच नव्हते परकेपण,

हळू हळू झाला गं संस्कार
विवाहाचा माझ्या मनावर
बीज हळू हळू अंकुरले
आणि रुजले जणू खोलवर,

हळू हळू करते सुरुवात
संस्कृति आपली
सही करुन कशी होईल गं
गुम्फण आपलेपणाची,

आपली संस्कृति जपते
आपलेपण आणि जिव्हाळा
उगाच नसतो सुन्दर
आपल्यातला लग्न सोहळा

मुक्ता गद्रे

11 comments: