नाक्यावरुन वळताना
झाड़ाखाली गणपती दिसतो
त्याला हळूच मान झूकवून
नमस्कार करायचा मोह होतोच..
झाड़ाखाली गणपती दिसतो
त्याला हळूच मान झूकवून
नमस्कार करायचा मोह होतोच..
पहिल्या पावसाच्या सरी कोसळताना
काही थेम्ब ओंजळीत घेवून
उगाच हळवे भावुक वाटून
स्वप्निल हसायचा मोह होतोच...
मॉडर्न कपडे अन मेकअप करुन
मोठ्या मॉल मधे continental खाऊन
शॉपिंगचा आनंद घेऊन झाला तरी
येताना भैयाच्या पाणीपुरी चा मोह होतोच...
किती crop टॉप्स घेतलेत
सर्व रंग अन pattern घेतले तरी
आईच्या आजीच्या मावशीच्या
मैत्रीणीच्या साड़ी चा मोह होतोच
सर्व प्रकारचे रोप लावून झाले
सगळे अगदी आधुनिक पद्धतिने सजवून झाले
तरी एक लाल जास्वन्द आणि एक तूळस
लावायचा मोह होतोच
कितीही मॉडर्न अन कूल पेहराव करा
बहिणीची साड़ी, आईची नथ,
आजीची ठुशी अन त्यावर गजरा लावून
दिवाळी अंकावरची मॉडल व्हायचा मोह होतोच
Harry पॉटर ची सगळी पुस्तके
वाचून काढणाऱ्या वाचकाला
गदा गदा हलवून मृत्युंजय युगंधर स्वामी
श्रीमंत योगी वाच असे सांगायचा मोह होतोच...
Promotion झाले असे
कळवल्या वर शाळेच्या ग्रुप वर
आपला आपल्या boss सकट
जो 'उद्धार' आणि 'सत्कार' होतो
ते पुन्हा पुन्हा वाचायचा मोह होतोच...
असंख्य वेब सीरीज,
OTT वरती new release
तरी रविवारी सकाळी रंगोली,
( जमल्यास मोगली ) अन
संध्याकाळी मराठी चित्रपटाचा मोह होतोच..
संध्याकाळी मराठी चित्रपटाचा मोह होतोच..
कपिल शर्मा बंद करुन चला हवा येऊ दया
घर बघताना पू ल देशपांडे चा शत्रुपक्ष अन
चितळे मास्तर ऐकत, चितळे बाकरवड़ी खाताना
धनंजय माने इथे च राहतात का..चा मोह होतोच
झींगाट वर Dance करणारी
अन Twinkle Twinkle शिकणारी
मुलगी सकाळी 'टाल बोले चिपलीला ' म्हणते
तेव्हा आजी आजोबाला
मनोमन धन्यवाद म्हणायचा मोह होतोच...
शुक्रतारा, कट्यार, धुंदी कळ्याना
मोगरा फुलला, झाले मोकळे आकाश
आणि बरोबर गणपतिच्या दिवसात
अष्टविनायकचे नादब्रम्ह ऐकायचा मोह होतोच..
स्वतःची पिल्ले थोड़ी ignore करुन
सुट्टीत् भाचे पुतणे एकत्र आणून
जुन्या आठवणी काढत
त्यांचे खूप लाड करायचा मोह होतोच..
सुट्टीत् भाचे पुतणे एकत्र आणून
जुन्या आठवणी काढत
त्यांचे खूप लाड करायचा मोह होतोच..
निष्पाप लोभस सहजपणा
क्षणात मन शांत करुन जातो
कस कोण जाणे पण
साधे साधे जगण्याचा मोह होतोच..
मुक्ता सुमित गद्रे
पुणे
🌻🌷🌱🌿🪴🪴✨️🎊🏡
No comments:
Post a Comment