Monday, February 22, 2021

दंभ

 










तू खरा शुद्ध शिव

मी दंभ कुरवाळणारा
पोचता पोचता
राहून जातो...तुझ्या पर्यंत

तू शिंप्यातला 
मोती खरा खरा
मला हरवतो 
क्षुद्र अहंकार माझा

तूच सांगतो भगवत गीतेत 
तुझ्या शिवाय मुक्ति संभव नाही
इंचभर भासते राहिलेले अंतर
पण प्रवास पूर्णत्वास जात नाही

हाती येता येता
निसटून तू जातो 
वितभर अंतर
क्षणात त्याचा डोंगर होतो

तू इतका खरा की
मी मूर्तिमंत दंभ भासावे 
तुझ्या निस्सीम खरेपणात
माझे क्षणात वीरघळून जाणे 

नको मला मुक्ति वा मोक्ष
फ़क्त हा दंभ तेवढा घे
तुझ्यासमोर उभा राहु शकेन
एवढा शुद्ध भाव अन विनय दे

बाकी नको काही खरच
माझ्याच कोषातून मला मुक्ति दे
स्वत: स्वत:ला नजर देऊ शकेन
असे प्रामाणिक प्रयत्नाचे वरदान दे

सच्चेपणाचा गंगास्पर्श दे
माझ्यातला दंभ भस्म होऊन
क्षणिक का होईना
'शिवोहम'ची अनुभूति दे 


-मुक्ता गद्रे 

No comments:

Post a Comment