Saturday, November 21, 2020

सोनेरी पहाट




तू ये..
हसत हसत
लहान मुलीसारखी
नाचत बागडत
हळूच मिश्किल चिडवत

तू ये..
आम्ही वाट बघतोय
डोळ्यात तेल घालून
प्रत्येक जण आतुरतेने
मंदस्मित करत तू ये..

तू ये..
काळी रात्र जाताना शिकवतेय
सूर्यकिरणांची महती
तू आलीस की स्वागत करू
हात दोन्ही पसरून

तू ये..
आमचे शिकून झालय
समजुतीने घेवून झालय
धैर्य दाखवून झालय
देवाला प्रश्न विचारुन झालय

तू ये..
ऊत्तर घेवून...सोपे सहज़ साधे
तुझ्या सारखेच
आम्ही नाही वाढवणार
क्लिष्टता जीवनाची.. यानंतर

तू ये..
धावायची गति कमी झालीय
चव येतेय जीवनाला
उदर-भरण नोहे.. स्वाद येतोय
तुझी वाट बघताना...

तू ये...
सोनेरी नव्हाळी लेवून
सर्वांची नवी पहाट
सर्वांची नवी सकाळ
एक नविन सुरुवात

तू ये..
तेवढ्याच आतुरतेने, उत्सुकतेने
तेवढ्याच निरागसतेने
राम भरत मिलन जणू किंवा
बाळाने टाकलेले पाहिले पाउल जणू

राम प्रहरी उष:काल होउ दे
प्रात:काली नवी प्रभात होउ दे
नविन ऊभारीने नवी सुरुवात होउ दे
उद्याची पहाट तू सोनेरी होऊन ये....

-- मुक्ता

No comments:

Post a Comment