"तुमच्या मते कुठल्या प्रोफेशनला सर्वात जास्त पगार असायला हवा ?"
"आई
!" मानुषी छिल्लर म्हणजे एका विश्व सुंदरी
च्या उत्तराला सर्व जगाने उचलून
धरले .. त्याचे कौतुक झाले ..
मला
सुद्धा पटते की आई
ला थकवा येत नाही.
आई जवळ नेहमी वेळ
आणि संयम असतो .
मुले मोठी झाल्या नंतर याच आईची ओळख गृहिणी म्हणून केल्या जाते
माझ्या
मते गृहिणी होणे सन्माननीय आहे.
याने साध्य होणारे समाजकार्य खूप मोठे आहे.
दिसते त्यापेक्षा खूप महान आहे
. अस लिहिण्या मागे वेगळे विचार
आहेत
एका
मेडिटेशन मध्ये एक वाक्य ऐकले
होते. "शांत रिलॅक्स व्हा.
जणू आई घरी आहे
...." (Feel as if Mom is At home … rest Assured..)
किती
सुंदर आणि relaxing वाक्य
आहे हे ..
माझ्या
मते आजच्या जगात घरात गृहिणी
असणे म्हणजे घरातला अनेक प्रकारचा ताण
कमी करणे . घरात एक शांतता
आणि तणावमुक्त वातावरण राहते .
कोरोना
काळात माझा जॉब गेला
. मी माझ्या ३ वर्षाच्या मुलीला
वेळ देता यावा म्हणून
, कोरोना पासून सुरक्षा म्हणून आणि १० वर्ष
नोकरी झाल्या नंतर थोडा ब्रेक
म्हणून काही महिने घरीच
राहायचा निर्णय घेतला.
त्या दरम्यान मी एका लग्नाला गेले . परंतु मला भेटणारी प्रत्येक दुसरी व्यक्ती माझा जॉब गेला म्हणून हळहळत होती . थोडा बोभाटा झाला .. मला अपमान नाही वाटला पण आश्चर्य वाटले कारण त्यातल्या बहुतेक सर्वच गृहिणी होत्या .. याचा अर्थ त्या स्वतःला सुद्धा कमी समजत असाव्या.
गृहिणी म्हणजे गरीब बिचाऱ्या नसतात . त्यात कमीपणा सोडाच , भरपूर फायदा असतो .घराला एक strong foundation दिल्या जाते, नंतर तिथे तणावमुक्त बालपण अनुभवता येते.
घरी कुणी आपले
घर २४ तास बघतेय
म्हंटले कि ऑफिस मध्ये
छान काम करता येते.
माझ्या जिजाजी ना ३ ते
६ महिने जहाजा वर असावे लागते
. पण
आईवडील आणि दोन्ही मुले
बायको जवळ असल्याने त्यांना
काम करताना आत्मविश्वास आणि पूर्ण मन लावून काम करता येते. माझी बहीण सुद्धा
खूप अभिमानाने गृहिणी असल्याचे सांगते.
माझे चुलत सासरे लवकरच जॉब सोडून होममेकर झाले . त्या काळी !! माझ्या चुलत सासूबाईंना नोकरी करता यावी म्हणून. कारण त्याचा भविष्यात फायदा होणार होता. आज त्या प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या नोडल ऑफिसर म्हणून निवृत्त झाल्या.
समाज होम मेकर ला कमी समजत नाही. 'Ki n ka' या चित्रपटात तो हाउस husband आणि ती job करते. त्यातील एक वाक्य आठवते -" इज़्ज़त कोई भी काम अच्छेसे करनेसे मिलती है!"
मी नंतर जॉब शोधायला सुरुवात केली . जॉब मिळाला. Home loan वगैरे साठी दोघांनी जॉब करायची गरज आहे पण कुठल्याही कंपनीने मला जॉब मध्ये गॅप दिसतेय वगैरे असा काहीही विचारले नाही . ISSUE केला नाही. अगदी अपवादाला सुद्धा नाही . तेवढी DIGNITYअसलेलीच कंपनी join करावी.
पुरुष तणाव मुक्त वागु शकत नाहीत. "Mom is at home.. " ती feeling फ़क्त स्त्रीच निर्माण करू शकते.
मुद्दा
असा कि गृहिणी असल्याने
घरातील ३-४ लोकांचे
आयुष्य सुरळीत होते . असे अनेक घरातील
लोक मोजले तर समाजातले गृहिणींचे
योगदान खूप मोठे आहे
. कारण तणाव हा आता
च्या दैनंदिन जीवनातला महाराक्षस झालाय. गृहिणी च्या असण्याने घरातील
तणाव कमी होतो . घरातील
लहान मुले खूष असतात
. त्यांचा सर्वांगीण विकास होणे सोपे होते
. अनेक कला गुणांना वाव
देणे शक्य होते. समजातील वाईट स्पर्श आणि प्रवृत्ति पासून मुलांना वाचवणे homemaker la जास्त सहज़ साध्य होते. आजकाल
मोबाइल, दारू , सिगारेट , drugs वगैरे व्यसनाचा धोका असल्यामुळे आईला
जास्त लक्ष देणे शक्य
होते . मुलांना बाहेर वागताना सुद्धा धाक राहतो . घरात
शिस्त राहते . घरात रोज पूजा
होते . त्यामुळे तसे संस्कार होऊन
जातात. सणवार उरकल्या सारखे न होता हौसेने
केल्या जातात . संस्कृती आपोआप जपल्या जाते . मुले देवघराकडे बघत
जरी नसतील तरी त्याचा कुठे
ना कुठे परिणाम होतो.
नोकरी
करून सुद्धा सर्व जणी उत्साहाने सगळे करतातच . स्त्री शक्तीला काही अशक्य ते
नाहीच . परंतु
गृहिणी म्हणून कुणी कमी
पणा बाळगू नये . उलट अभिमान असावा.
काहींजणी गृहिणी म्हणून इतक्या हिणवल्या जातात कि त्यांच्या मुलींना खूप मोठी नोकरी स्वीकारुन त्यांनी घरात कमी लक्ष घालावे असे आपोआप शिकवल्या जाते.
गृहिणी होणे ऐच्छिक असणे जवळ जवळ अशक्य होतेय. काही घरी सधनता असली तरी हौस म्हणून मूली नोकरी करतात. त्याला जशी कोणी हरकत घेत नाहीत तसेच कुणी स्वतःच्या इच्छेने गृहिणी होणार असेल तर त्याला सुद्धा सहज़ स्वीकृति असायला पाहिजे. गृहिणी म्हणून अभिमानानेच नाही तर डिग्निटीने जगावे. कारण तुमची किंमत खूप जास्त आहे . कारण तणाव नावाचे वादळ तुम्ही दूर करता.
नौकरी/व्यवसाय असो व नसो अभिमानाने आणि आनंदाने जगावे . गृहिणीचा
सन्मान समाज किंवा परिवार
कधी करतील याची वाट बघू
नये .
श्री श्री रविशंकर
म्हणतात त्याप्रमाणे कुणी आपल्याला
पुष्पगुच्छ आणून
देईल याची वाट बघत
बसू नये . स्वतः रोपटे लावून बाग फुलवावी आणि आपले जीवन आपणच आनंदी
करावे.
मुक्ता
गद्रे